||श्री मारुतिस्तोत्र||
भीमरूपी स्तोत्र म्हणजे मारुतीचे स्तोत्र. हे स्तोत्र विशेषत: सायंकाळी देवापुढें बसून म्हणतात.
भीमरुपी महारुद्रा , वज्रहनुमान मारुति । वनारी अंजनीसूता , रामदूता प्रभंजना ॥ महाबळी प्राणदाता , सकंळा उठवी बळें । सौख्यकारी दःखहारी , दुत वैष्णवगायका ॥
दीननाथा हरीरुपा , सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥ लोकनाथा जगन्नाथा , प्राणनाथा , पुरातना । पुण्यवंता,पुण्यशीला , पावना परितोशका ॥
ध्वजांगे उचली बाहो , आवेशें लोटला पुढे । काळाग्नी , काळरुद्राग्नी , देखतां कांपती भयें ॥ ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती । नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा , भ्रुकुटी,ताठिल्या- बळें ॥
पुच्छ तें मुरडिलें माथां , किरीटी कुंडले बरीं । सुवर्णकटिकासोटी,घंटा किंकिणि नागरा ॥ ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठे , महाविद्युल्लतेपरी ॥
कोटिच्या कोटि उड्डाणें , झेपावें उत्तरेकडे ॥ मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥ आणिला मागुती नेला , आला गेला मनोगतीं । मनासी टाकिलें मागें , गतीसी तुळणा नसे ॥
अणुपासोनी ब्रम्हांडा येव्हडा होत जातसे । तयासी तुळणा कोठें , मेरुमंदार धाकुटे ॥ ब्रम्हांडाभोंवतें वेढे , वज्रपुछए करुं शके । तयासी तुळणा कैंची , ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥
आरक्त देखिलें डोळा , ग्रासिलें सुर्यमंडळा। वाढ्ता वाढता वाढे , भेदिलें शुन्यमंडळा ॥ धनधान्य, पशुवृध्दि,पुत्रपौत्र समग्रही । पावती रुपविद्यादि , स्तोत्रपाठें करुनीयां ॥
भूतप्रेतसमंधादि , रोगव्याधि समस्तहि । नासती तुटती चिंता , आनंदे भीमदर्शनें । हे ध्ररा पंधरा श्लोकी , लाभली शोभली बरी ॥ दृढदेहो निसंदेहो सौख्ये चंद्रकळागुणें ॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू । रामरुपी अंतरात्मा , दर्शनें दोष नासती ॥ ।। इति श्रीरामदासकॄत संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥ |
|
No comments:
Post a Comment