एका बापाची व्यथा .......
पाटी पुसून कोरडी करणं इतकं सोपं नसतं गं
मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं
मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं
फोडासारखं जपलं तुला, मनासारखं फुलू दिले
रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले
तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं
रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले
तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं
सतरा हे काय वय का गं असा निर्णय घेण्याचं
अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं
तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं
अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं
तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं
काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर
त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर
'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं
त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर
'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं
शेवटच्या त्या क्षणी पिल्ला, तुला खूप दुखलं का ?
कणभर का होईना , आमची आठवण आली का ?
सतत प्रश्न घेऊन जगणं इतकं सोपं नसतं गं
कणभर का होईना , आमची आठवण आली का ?
सतत प्रश्न घेऊन जगणं इतकं सोपं नसतं गं
No comments:
Post a Comment