रगडा पॅटिस
साहित्य रगड्यासाठी:
१ मोठी वाटी
पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून
६-७ तास
भिजवून ठेवणे
१/४ टीस्पून
हिंग
१/२ टेस्पून
हळद
१-१/२
टीस्पून लाल तिखट
(आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टीस्पून काळा मसाला
मीठ चवीनुसार
१ टीस्पून चिंचेचा कोळ
पाकृ:
पांढरे वाटाणे हिंग व
हळद घालून कुकरला
मऊसर शिजवून घ्या.
पातेल्यात तेल गरम
करुन त्यात शिजवलेले
वाटाणे, लाल तिखट,
काळा मसाला, मीठ,
चिंचेचा कोळा व
थोडेच पाणी घालून
उकळी आणा.
रगडा नीट शिजला
की गॅस बंद
करा.
(आवडत असल्यास फोडणीत चमचाभर
आले+लसूण पेस्ट
परता)
साहित्य पॅटिससाठी:
४-५ बटाटे
उकडून, सोलून, किसून घ्या
म्हणजे पॅटिस करताना गुठळ्या
राहणार नाही.
२ टेस्पून आले+ लसूण+
हिरवी मिरची वाटून
(तुम्ही पेस्ट वापरु शकता,
मला भरडसर वाटलेले
आवडते म्हणून तसे
घेतले आहे)
१/२ टीस्पून
हळद
१/४ टीस्पून
चाट मसाला
मीठ चवीनुसार
मैदा बाईंडिंगसाठी
पाकृ: बटाट्याच्या
मिश्रणात वाटलेले आले+ लसूण+
हिरवी मिरची, हळद,
चाट मसाला, मीठ
व मैदा घालून
चांगले मिक्स करावे.
मिश्रणाचे छोटे गोळे
घेऊन चपटे करुन
पॅटिस तयार करावे.
नॉन-स्टिक तव्यावर तेल
घालून पॅटिस दोन्ही
बाजूंनी खमंग शॅलो
फ्राय करावे.
साहित्य सर्व्हिंगसाठी:
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथींबीर
चाट मसाला
चिंच-खजुराची चटणी
( १ वाटी चिंच
गरम पाण्यात भिजवून
त्याचा कोळ काढून
घ्यावा, गरम पाण्यात
१/२ वाटी
खजूर भिजवून, वाटून
घेणे. चिंचेचा कोळ
उकळायला ठेवावा, उकळी आली
की त्यात गुळ
, वाटलेला खजूर, लाल-तिखट,
सुंठपूड, जीरे पावडर
व मीठ किंवा
सैंधव घालावे.)
पुदिन्याची चटणी
( मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिना,
हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस,
मीठ, जीरे व
साखर एकत्र वाटून
चटणी बनवणे.)
वरुन घालायला शेव/ फरसाण
(इथे शेव सहज
मिळत नसल्यामुळे मी
फरसाण वापरले आहे
तुम्ही भरपुर शेव घालून
सर्व्ह करु शकता
:) )
सर्व्हिंगः
एका प्लेटमध्ये रगडा घालून
घ्या त्यावर तयार
पॅटिस ठेवावे.
आता त्यावर पुदिन्याची चटणी
व चिंच-खजुराची
चटणी घालावी.
वरुन चिरलेला कांदा व
कोथींबीर घालावी.
वरुन शेव/ फरसाणने
गार्निश करुन सर्व्ह
करावे.रगडा पॅटिस
खाण्यासाठी तयार आहे
:)

No comments:
Post a Comment