Saturday 28 March 2015

एक लहानसा ससा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.

नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.

मरता मरता ससा म्हणाला, 'तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.'


तात्पर्य -एकमेकांशी सतत भांडणार्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.



एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.'


तात्पर्य - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणामागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये



एका वडाच्या झाडाखाली काही उंदीर रहात असत. एकदा त्यांना असे वाटले की, ज्या ज्या वेळी आपल्याला भूक लागते त्या त्या वेळी वडाची फळे खाण्यासाठी
आपल्याला वडाच्या झाडावर चढावे लागते. त्यापेक्षा ते झाडच खाली पाडले तर
बरे होईल. असा विचार करून काही उंदीर त्या झाडाची मुळे कुरतडण्यास निघाले.
तेव्हा काही शहाणे उंदीर त्यांना म्हणाले, 'अरे बाबांनो, तुम्ही जे
करताहात, त्याच काय परिणाम होईल. हे लक्षात घ्या. एकदा झाड मोडून खाली
पडल्यावर, पुढे जन्मभर आपल्याला जी फळं पाहिजेत, ती कोण देईल, याचा विचार
केला का?'



तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होईल याचा दूरवर विचार केला पाहिजेएका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...
...
का?




No comments:

Post a Comment