Wednesday 25 March 2015

kahi kahi chan chan वाक्ये

पारिजातकाचे झाड हलवावे आणि धपाधप फुलांचा सडा पडावा, तसं सुख यावं आयुष्यात....
================================================================================
किती विचित्र आहे हे जग! घरच्या माणसांची किंमत कळायलाही घराबाहेर पडाव लागत इथ!
================================================================================
"सुखाचं एक दार बंद होताच, दुसरं दार आपोआपच उघडंल जातं. पण आपण आपले डोळे बंद केल्यामुळे हे उघडलेले दार आपल्याला दिसत नाही. दोष सुखाचा नसतो, आपल्या दृष्टीचा असतो. सुख तर सतत आपल्या भोवती रेंगाळत असतं. डोळे उघडुन पाहिलं कि ते चटकन आपल्या हाती गवसतं."
================================================================================
समाज हा जसा एका माणसामुळे बनत नाही, तसाच विश्वास हा केवळ एका माणसामुळे उडत नाही. आणि शेवटी जखम कितीही खोल असली तरी केंव्हा ना केंव्हा ती भरतेच.
================================================================================

जेव्हढे दिवस.......ज्या तर्‍हेने हसत खेळत जातील, जाऊ द्या. तिथे कुठे मतभेताचे कारण निर्माण होतंय, असे वाटताच त्याला तिथेच सोडुन पुढे निघुन जावं.
================================================================================
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
* प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच.....
* पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....
वपुर्झा : व. पु. काळे
*जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
*पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बर्याचदा होते..
गुलमोहर : व. पु. काळे
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" 
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्यापडल्या उपभोगू शकता. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागत." - व. पु. काळे
================================================================================
"Yesterday is history. Tomorrow is a mystery, Today is a gift and that's why we call it present "
================================================================================"When u ask GOD for something....
He answers in three ways.....
1. He says "Yes" and gives you what you want........
2. He says "No" and gives you something better.........
And
3.He says "Wait" and gives you the Best!!!!!!"
==============================================================================
"चिऊताई, चिऊताई, दार उघड", असं विनवणार्‍या काऊला चिऊताईनं "थांब माझ्या बाळाला...." असं बजावत तिष्ठत उभं ठेवलं होतं. या चिमण्या बाळांच्या गोष्टीमध्ये "खूप मोठा पाऊस" आला होता. काऊचं उघड्यावरचं शेणाचं घर पावसात विरघळून गेलं. चिऊच वळचणीतलं मेणाचं घर मात्र सुखरूप राहिलं. पण नंतर काय झालं माहीत आहे? खूप मोठ्ठा पूर आला, "माणसांचा"! त्या पुरात वाडे, अंगण, पडव्या, ओसर्‍या, बखळी, परस, सगळं काही वाहून गेलं. शेवगे, चाफे, जाईजुई, पारिजातक, सिताफळी, आवळे, सगळे गेले. चिऊचं घर मेणाचं असूनही माणसांच्या महापुरात वाहून गेलं.
गावाताल्या चौका-चौकात लावलेली प्रदूषण मोजणारी घड्याळं इथल्या माणसांना वाचता येत नाहीत, पण चिमण्या-कावळ्यांना ती नीट वाचता येतात आणि समजतात. म्हणून इथले चिमण्या केव्हाच गावाबाहेर गेलेत, शुद्ध मोकळ्या वातावरणामध्ये!!!
"या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या" असं म्हणायची तिन्हीसांज केंव्हाच सरली आहे
===============================================================================
असूनही जी दिसत नाही,पण मनाला जाणवते,ती भावना.जे नजरेला दिसतं,तो व्यवहार.
================================================================================
हिवाळ्यात पहाटे उठू नये. उठलेच तर निदान हे असले बिभासी ढग पाहू नयेत. ते पाहिले की माणूस ढगवेडा होतो. सबंध दिवसभर ढगांना लोंबत बसतो. ढगांच्याच लयीत त्याचे मन फिरू लागते; ढगांसारखे वेडेवाकडे आकार घेते. त्या ढगांना पुन्हा रात्रीच्या हवाली केल्याशिवाय माणसाचे पाय पृथ्वीला टेकत नाहीत. असे पिसे लागते याचे कारण सरळ आहे. पहाटेचे ढग हे खर्‍या अर्थाने ढग नसतात; ती ढगांची गर्भावस्था असते. आकारापूर्वीचे हे निराकार पाहण्याचा माणसाला काय अधिकार आहे? सृजनापूर्वीची सृष्टीची गुपिते पाहणारांना असाच शाप मिळतो. असे केले म्हणजे माणसाला त्याच दिवशी त्याचे प्रायश्चित्त घ्यावे लागते; ढगासारखे स्वतःला पिंजावे लागते; ढगामागोमाग रंगांना शरण जावे लागते. आपल्या आत्म्याचे विसर्जन करून अनामिकात शिरावे लागते. पुन्हा त्या ढगांना रात्रीच्या हवाली केल्याशिवाय माणसाचे पाय पृथ्वीला टेकत नाहीत. "
=================================================================================
लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचव आणि कुठेतरी संभाळून सेव ही ठेवा परत वाच्यानासाठी!
'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...
- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं..
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.
- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,
- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.
मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...
एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..
========================================================================"आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा हि जशी माऊली बाळा"
================================================================================
अनुभवाचं आकाश तेच असलं तरी मनाची चौकट मात्र दर वेळी वेगळी असते. मनाची ही खिडकी बंद आहे की उघडी ह्यावरुनही आकाशाचा रंग ठरतो
=============================================================================
आपल्याला जे मिळतय ते सुद्धा बर्याच जणांसाठी स्वप्न असते..
  
================================================================================
आपल्याला जेंव्हा जेंव्हा खूप त्रास होतो तेंव्हा समजावे की देव आपली

 परीक्षा घेतोय.

No comments:

Post a Comment