Friday 13 March 2015

आई

आई म्हणजे नसती कटकट
सारखा पिच्छा पुरवीत राही
शाळेत जाताना जबरदस्तीने खाऊचा डब्बा हातात देई ||
तरुण झालो , कॉलेजात गेलो , तिला त्याची जाणच
नाही
हळूच गाडी चालव बाळा बोलल्या शिवाय
राहायची नाही ||
बाप झालो तरी देखील बाळासारखे वागवत
राही
चिऊला नका नेऊ स्कूटरवर वेड्यासारखी सांगत
राही ||
कसल्या खुळचट तिच्या कल्पना चार चौघात सांगवत
नाही
परदेशी मी जात
असताना हातावरती द्यायची
दही ||
कितीही चिडलो ,ओरडलो तरी
परिणाम काही व्हायचा नाही
सारख्या सूचना द्यायची तिची सवय
गेलीच नाही ||
एक दिवस असा आला ओरडायची वेळ
आलीच नाही
अंथरुणात पाठ टेकल्यावर
ती सकाळी उठलीच
नाही ||
तारुण्याच्या कैफामध्ये तिची माया कळलीच
नाही
चिडू ओरडू आता कोणावर आता घरात आईच नाही ||
तिची आठवण येत नाही असा दिवस जात
नाही
दाहक वास्तव विस्तवापरी तनमनाला जाळत
राही ||
आई जिवंत असताना तिची किंमत वाटत
नाही
आई शिवाय जगताना कशाचीच किंमत वाटत
नाही ||

No comments:

Post a Comment