Saturday 28 March 2015

CHAN CHAN GANI

मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून
       ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती
       साद घालती पुन्हा नव्याने ती रक्‍ताची नाती
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
      आई भवानी तुझ्या कृपेने
      आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्‍ताला
      अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
      आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी   आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
       गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
       हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
       धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
       भक्‍ती दाटून येते आई नाव तुझे घेता
       आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी   आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
       अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
       हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
       अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
       महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज आम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी   अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये
     अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
     बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
     सप्‍तशृंगी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं







या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
      चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
      हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
      फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
        बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
        वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
        नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
                              या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो तुम्ही मला अधार
नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार
     आईस देव माना, वंदा गुरूजनांना
     जगि भावनेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा
     गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार
शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे
जे चांगले जगी या त्यांचा करा स्विकार
     शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा
     हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा
     कुलशील छान राखा ठेवू नका विकार
अष्टविनायका तुझा
स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्सदा मंगलम्
       जय गणपती गुणपती गजवदना
         आज तुझी पूजा देवा गौरीनंदना
         कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
         काळजात सिंहासन मधोमधी गजानन
         दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना
  अष्टविनायका तुझा महिमा कसा
  दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
गणपती, पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं घेतला वसा

गणपती, दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सार्यांनी
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यांनी
रमा बाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा

गणपती, तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्य मधु कैटभानं गांजलं हे नगर
ईष्नुनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभार्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा

गणपती, चौथा गणपती
पायी रांजणगावचा देव महागणपती
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा

गणपती, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा

गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव
दगडामंदी कोरलाय्भक्तिभाव
रमती इथे रंका संगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला हो
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा

सातवा गणपती राया
महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन् मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा

आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा

मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया

      ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरु दिसले
माय उभी ही गाय होऊनी,
पुढे वासरु पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे, पायावर झुकले
चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु, स्वानंदे फिरले
तुम्हीच केली सारी किमया,
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर वसले
      सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?
     मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ?
      हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ?
      जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ?
      बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का
      दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे

मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे

थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे

माझ्या या घराच्या पाशी, थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे


रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
     ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे

लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जीनं व्होवं आबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे

लक्शिमिच्या हातातली चवरि व्हावी वर खाली
इडा पीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाउ दे !

सूक थोडं, दुक्क भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे !
     रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला !

नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !

जात होते वाटंनं मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !

भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
      सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला

जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला


vkdk'kh >ksi ?ks js ik[kjk lksMh lksU;kpk fiatjk
rqt Hkorh oSHko ek;k] iQG jlkG feGrs [kk;k
lq[kyksyqi >kkyh dk;k] gk dqBoj osM;k ?kslh vkljk
?kj dlys gh rj dkjk] fo"k leku eksrh pkjk
Ekksgkps ca/ku }kjk] rqt vkMforks gk rSlk macjk
rqt ia[k fnys nsokus] dj fogkj lkeF;kZus
njh Mksaxj fgjoh jkus ] tk vksykaMwu ;k lfjrk lkxjk
d"Vkfo.k iQG uk feGrs ] rqt dGrs ifj uk oGrs
gn;kr O;Fkk gh tGrs]  dk tho fcpkjk gksbZ ckojk
?kkekrqu eksrh iQqyys ] Jenso ?kjh vorjys
?kj izlUursus uVys] gk ;ksx thouh vkyk lkftjk
स्वप्नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?
मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

स्वप्नात साजणा येशील का ?

ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

स्वप्नात साजणा येशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता
मधुमिलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?

स्वप्नात साजणा येशील का ?
     देव जरी मज कधी भेटला,
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे,
जीवन देई मम बाळाला

कृष्णा गोदा स्नान घालु दे,
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी,
मुक्ताई निजवु दे तुजला

शिवरायाच्या मागिन शौर्या,
कर्णाच्या घेइन औदार्या
ध्रुव, चिलयाच्या अभंग प्रेमा,
लाभु दे चिमण्या राजाला
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन्पालखी निघाली

केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली

नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली

       असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

स्वये मनात जागते सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखर ने को
मिलते हैं दिल यहाँ, मिल के बिछड़ ने को
कल रहे ना रहे, मौसम ये प्यार का
कल रुके ना रुके, डोला बहार का
चार पल मिले जो आज प्यार में गुजार दो
झीलों के होठोंपर मेघों का राग हैं
फूलों के सीने में ठंडी ठंडी आग हैं
दिल के आईने में ये तू समा उतार ले
प्यासा हैं दिल सनम प्यासी ये रात हैं
होठों में दबी दबी कोई मीठी बात हैं
इन लम्हों पे आज तू हर खुशी निसार दे
 
केवळ आपल्या स्वार्थासाठी, कलह नसावा घरामध्ये,
आपुलकीच्या नात्यांमधून, स्नेह जपावा मनामध्ये !!धृ !!

येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी
जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्याविषयी ओढ हवी
ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये !!!!

भांड्याला लागतेच भांडे, विसरुनी जावे क्षणामध्ये,
परस्परांना समजून घ्यावे, अढी नसावी मनामध्ये
रुसवे फुगवे नको फुकाचे, मोद राहावा मनामध्ये !!!!

नित्य काळजी घ्यावी, वय झालेल्या पानांची,
ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मनाची,
एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा मनामध्ये !!!!

लळा - जिव्हाळा आत असावा, नको उमाळा वरकरणी,
नको घराला गर्व धनाचा, लीन रहावे प्रभूचरणी,
दिवसा राती परमेश्वराचा, वास असावा घरामध्ये !! !!

केवळ आपल्या स्वार्थासाठी, कलह नसावा घरामध्ये
आपुलकीच्या नात्यांमधून, स्नेह जपावा मनामध्ये


दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे ध्रु
बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यांत
ह्रुदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळ्या बकुळफुलांची, शपथ तुला आहे
शुभ्र फुले रेखित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, " चंद्रोत्सव हा, सावळ्या भुईचा"
फुलांतल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे
भुरभुरता पाउस होता, सोनिया उन्हांत
गवतातुंन चालत होतो, मोहुनी मनांत
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे
हळूहळू काजळतांना, सांज ही सुरंगी
तुझे भास दाटुनि येती, असे अंतरंगी
या उदास आभाळाची, शपथ तुला आहे || ||


No comments:

Post a Comment