Friday 20 March 2015

recipe--------------- kothimbir bhat ,, cake

केक


करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय
हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!
साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा, चार चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा( रु.) चा सॅशे.
क्रमवार पाककृती:
कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
चार चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो.


कोथिंबीर भात

लागणारे जिन्नस:
तांदूळ - वाट्या
कोथिंबीर - आवडेल तेव्हढी बारीक चिरून (मी एक वाटी घेतली होती)
कांदा - मध्यम आकाराचा बारीक चिरून
हिरव्या मिरच्या - चिरून (आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकता)
क्रमवार पाककृती:
. तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावा.
. कांदा, मिरची, कोथिंबीर mixer मधून बारीक पेस्ट करून घ्यावी.
. कढईत फोडणी करून घेऊन वरील पेस्ट चांगली परतून घ्यावी.
. तांदूळ घालून पुन्हा परतावे.
. पाणी घालून एक उकळी आल्यावर मीठ घालावे शिजू द्यावे.
. लसणाच्या चटणीबरोबर/दह्याबरोबर/तुपाबरोबर गरमागरम गट्टम करावे
























No comments:

Post a Comment